जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी पाणीपट्टी माफ

0
23

संपूर्ण देशात खाजगी शाळांनी, त्यांच्या फी ने पालकांची डोकेदुखी वाढवली असून, यामुळे जिल्हा परिषद शाळांना टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. मात्र या महागाईच्या काळात सरपंच विलास अडकमोल यांच्या अध्यक्षतेखाली आणि सूचक आरिफ कलंदर तडवी यांच्या सुचनेनुसार यावल तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायत वतीने एक अनोखा उपक्रम गावात राबविण्यात येत आहे.

जिल्हा परिषद शाळा कोरपावली मध्ये इयत्ता १ लीच्या वर्गात जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्या कुटुंबियांना चालू वर्ष २०२५/२६ मध्ये घरपट्टी व पाणीपट्टी या वरती लागणारे सर्व कर माफ करण्यात येणार आहेत. सदर निर्णय दिनांक ९ जून २०२५ रोजी सरपंच यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला असून असा मासिक सभेमध्ये सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयास हफशान जुम्मा यांनी अनुमोदन दिले आहे.

एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी शिक्षणामुळे पालकांचे डोकेदुखी वाढली असून या खाजगी शिक्षणामुळे अनेक जिल्हा परिषद शाळांना कुलूप ठोकण्यात आले आहे. अनेक शाळा बंद पडल्या असून उर्वरित बंद होण्याच्या मार्गावर असताना या महागाईच्या काळात कोरपावली ग्रामपंचायत ने घेतलेला हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे. या कारणाने संपूर्ण यावल तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे, सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love