भुसावळ – येथून जवळच असलेल्या वराडसिम येथील बसस्थानक चौका नजिक सुबाभूळ च्या झाडाला राजेंद्र रतन गायकवाड ( भिल्ल ) रा. जोगलखोरी वय ३५ या तरुणाने गळफास घेतल्याची घटना घडली.ही घटना दि १२ च्या रात्री ते दि १३ फेब्रुवारीच्या पहाटे च्या कालावधीत घडली असावी असे बोलले जात आहे.त्याच प्रमाणे जर त्याला गळफास घेऊन आत्महत्या करायची होती तर जोगलखोरी शिवार सोडून वराडसिम बसस्थानक चौका नजिक का आला ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार युनूस शेख , दिपक जाधव व पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत.यावेळी पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. यावेळी पोलीस पाटील सचिन वायकोळे व ग्रामस्थ उपस्थित होते.