पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या…; चंद्रकांत पाटलांना पुन्हा शाईफेकीची धमकी

0
15

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आज पवनाथडी यात्रेसाठी येणार आहेत. त्यापूर्वीच त्यांना पुन्हा शाईफेकीचा धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. “आज त्यांच्यावर पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु. पो. सांगवी (पवनाथडी यात्रा), पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या, चंपाचं तोंड काळे करा रे,” असा धमकीवजा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला आहे.

याप्रकरणी राष्ट्रवादीचे सोशल मीडिया प्रमुख विकास लोले आणि दशरथ बाबुराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर संबंधित मजकूर असलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करुन समाजात द्वेषभावना पसरविणे आणि धमकीचा आरोप आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी पोलिसात तक्रार दिली असून, दोघांवर 152, 505 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पवनाथडी येथे यात्रेसाठी येणार आहेत. त्यापूर्वीच समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने अशाप्रकारे धमकीवजा इशारा देण्यात आला आहे.

Spread the love