मनवेल – यावल येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील स्टॅम्प वेंडरांचा मनमानी व सर्वसामान्य जनतेला त्रासदायक, मनस्ताप देणारा असा कारभार वाढलेला असून या संबंधित कार्यालयाशी कामानिमित्त या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा पेच निर्माण झालेला आहे. येथील स्टॅम्प वेंडर कसे अरेरवी करत कोणाचा किती अपमान करतील याचा भरोसा नाही. याचाच प्रत्यय साकळी येथील एका दैनिकाच्या पत्रकारास आला.एकूणच लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ असलेल्या पत्रकाराचे तर सोडाच या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्याचे काय हाल होत असतील ? हे या घडलेल्या प्रकारावरून दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर घडलेली हकीगत असे की, साकळी ता. यावल येथील एका दैनिकाचे पत्रकार चंद्रकांत नेवे हे बँकेच्या संबंधित आपल्या वैयक्तिक कामासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्पची गरज आहे. म्हणून स्टॅम्प घेण्यासाठी यावल येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात (सब रजिस्ट्रार) दि. १९ जून २०२४ रोजी कार्यालयाच्या वेळेतच गेले असता त्यांनी त्या ठिकाणी दोन-तीन स्टॅम्प वेंडरांना अगदी नम्रपणे १०० रुपयांच्या स्टॅम्पची मागणी केली असता स्टॅम्प एक तासाने मिळेल किंवा आता शिल्लक नाही नाहीतर उद्या या असे काही उडवा-उडवीचे उत्तरे त्यांना काही स्टॅम्प वेंडरांकडून मिळाली. त्यानंतर एका व्यक्तीच्या सांगण्यावरून नेवे हे कार्यालयाच्या मागील नगरपालिका कॉम्प्लेक्स मधील वासुदेव रामचंद्र चौधरी या स्टॅम्प वेंडर कडे स्टॅम्प घेण्यासाठी गेले. दरम्यान या ठिकाणी स्टॅम्प घेण्यासाठी एक महिला व दोन व्यक्ती असे एवढेच व्यक्ती हजर असतांना नेवे यांनी वासुदेव चौधरी यांच्याकडे अगदी टेबलाजवळ उभे राहून नम्रपूर्वक शंभर रुपयाच्या स्टॅम्पची मागणी केली त्यावर चौधरी यांनी अगदी संतप्त व रागारागाने ‘अहो तुम्ही पहिल्यांदा खाली बसा, तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही का ? स्टॅम्प कुठे पळून चालले आहे का ? अशा बेजबाबदारपणाच्या शब्दात सांगून पत्रकार चंद्रकांत नेवे यांना अपमानास्पद वागणूक देऊन अपमान केला.
उगाच वाद नको वाद झाला तर आपल्यामुळे इतरांचीही कामे होणार नाही म्हणून चंद्रकांत नेवे यांनी आपण पत्रकार आहे अशी ओळख चौधरी यांना दिली नाही. या ठिकाणी साकळी येथील अजून एक- दोन नागरिक बसलेले होते. तेही हा प्रकार पहात होते.दरम्यानच्या वेळेत चौधरी यांच्याकडे शंभर रुपयांचे स्टॅम्प शिल्लक असतांना सुद्धा स्टॅम्प शिल्लक नाही असे सांगून सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी यांना ते परत पाठवीत होते.या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिक, शेतकरी,कष्टकरी, शालेय विद्यार्थी, महिला या सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅम्प किती अपार मेहनत घ्यावी लागत असेल ? किती तारेवरची कसरत करावी लागत असेल ? हे या प्रकारावरून स्पष्ट दिसून येत आहे.
याघडलेल्या प्रकारावरून यावल येथील निबंधक कार्यालयात कार्यालयाशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ असलेल्या पत्रकाराचे तर सोडा सर्वसामान्य नागरिकांचे काय हालत असतील याचा विचार न केलेलाच बरा नवीन आलेल्या व्यक्तीशी या ठिकाणी बसलेले कोणतेही स्टॅम्प वेंडर व्यवस्थित बोलत नाही माहिती सांगत नाही असा अनेकदा अनुभव आलेला आहे.
पत्रकार नेवे यांना शंभर रुपयांच्या स्टॅम्प घेऊन त्यांना तो घरी भितींवर शोपीस मध्ये लावायचा होता का ? एक स्टॅम्प घेण्यासाठी एवढा मनस्ताप सहन करावा लागत असेल तर मग संबंधित कार्यालयातील अधिकारी काय करत आहेत ? पत्रकारांचा अपमान करण्याचा अधिकार स्टॅम्प वेंडरांना कोणी दिला ? हा मोठा प्रश्न आहे.
तरी सदर घडलेल्या प्रकाराबाबत गांभीर्याने घेऊन संबंधित कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित स्टॅम्प वेंडरला योग्य ती समज द्यावी. अशी मागणी तक्रारदार चंद्रकांत नेवे यांच्याकडून केली जात आहे.