कडगाव येथील ग्रामविकास अधिकारी कुंदन कुमावत यांचा प्रताप. नमुना नं ८ दप्तरामध्ये हेराफेरी करूण लाखो रुपये लाटल्याचा आरोप.

0
29

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

जळगाव – तालुक्यातील कडगाव ग्रामपंचायतीला असलेले ग्रामविकास अधिकारी कुंदन कुमावत यांचे मनमानी कारभारबाबत व नमुना नं ८ ला केलेल्या हेराफरी बाबत येथील तक्रारदार मुरलीधर शिवदास कोळी, व इतर ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्यांनी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दाखल केलेली आहे.

याबाबत सविस्तर वृत असे कि कडगाव ता जि जळगाव येथील ग्राम पंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांचा मनमानी कारभारबाबत व नमुना नं ८ ला केलेल्या हेराफरी बाबत सविस्तर खालील प्रमाणे.

1) सन 2003 ते 2004 ते 16 ते 17 व 17 ते 18 या वर्षातिल नमुना नु 8 मध्ये अनुक. 1036 घर नं 945 वर बखळ जागेवर सरपंच ग्रा.पं. कडगाव ता जि जळगाव असी नोंद होती, परंतु 2) सन 2018 ते 2021 ते 22 या वर्षातील नमुना नं ८ मध्ये अनुक.1062 घर नं याच बखळ जागेवर मालक सदरील सरला उत्तम कोळी त्यांचे नाव दाखल केले आहे.घर नं 945 व घर नं 1062 ही जागा एकच आहे. ग्राम पंचायतचे चे रिव्हीजन मुळे नंबरची तपावत दिसुन येते आहे. पण जागा मात्र एकच आहे. सदरच्या जागेवर ग्रा.वि. अधिकारी कुन्दन कुमावत यांनी हेराफेरी केलेली आहे. या हेराफेरी मधुन लाखाने व्यवहार झालेला आहे. नमुना नं 8 वर खाडाखोड न करता कुन्दन कुमावत यांनी जळगाव येथील गायत्री इंटरप्रायजेस यांचे कडुन नमुना नंबर 8 चे पाणे बदल केलेले आहे. गायत्री इंटरप्रायजेसचे मालक यांचेशी मा. सभापती पं.स.जळगाव यांनी फोन व्दारे माहिती विचारली असता नमुना नं 8 चे दप्तर माझ्याकडे बायंडींग साठी आणलेले होते व त्याचे पेज सुद्धा बदलवण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगीतले. तसेच त्या दप्तराचे पेजनंबर सुद्धा बदल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे. अशा प्रकारे दप्तरामध्ये अफरातफर करण्याचा अधिकार कुन्दन कुमावत यांना कोणी दिलेला असेही तक्रारदाराने म्हटले आहे.

सदर जागेवर ज्यांचे नाव लावण्यात आलेले आहे. त्यांच्या पतीने सुद्धा सदर जागेवर माझ्या पत्नीचे नाव कुंन्द कुमावत यांनीच लावुन दिल्याचे कबुल केलेले आहे.

या प्रकरणा बाबत ग्रामविकास अधिकारी कुन्दन कुमावत यांना स्दसयांनी विचारणा केली असता त्या दप्तरामध्ये मि बदल केलेला नाही. मी राष्ट्रपती पुरसकार प्राप्त ग्रामविकास अधिकरी आहे. माझी कोणीही काहीही करु शकत नाही असे कुंदन कुमावत सांगत असतो

ग्राम.पं. दप्तरात हेराफेरी करण्याचा अधिकार नसतांना आपल्या मर्जीनुरुप मनमानी कारभार करणे . सदस्य व ग्रामस्थ यांचे सोबत उर्मट भाषेत बोलणे. अशा बेजबाबदार ग्रां वि अधिकारी यांची कडगाव ग्राम पं मधुन ताबडतोप बदली होवुन त्यांचा वर कठोर कार्यवाही करावी त्यांची बदली न झाल्यास जनतेत रोष निर्माण होवु शकतो अशी प्रकारची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकरी. जिल्हा परिषद जळगाव.गट वि. अधिकारी,सभापती पं.स.जळगाव, यांचे कडे करण्यात आलेली आहे.

Spread the love