हेमकांत गायकवाड
जळगांव : येथील जिल्हा अधिकारी कार्यालय शेजारी असलेल्या जिल्हा अधिकारी सभा हाँलला सर्वात अगोदर कैकाडी समाज आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अँड शिरिष जाधव यांच्या हस्ते संत कैकाडी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले व सभेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आलेल्या प्रमुख पाहुणे व संघटनेच्या पदाधिकारीचा सत्काराला सरुवात करण्यात आली. डिगंबंर जाधव(जिल्हा अध्यक्ष) याच्या हस्ते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड शिरिष जाधव याचा करण्यात आला. त्यानंतर शेखर जाधव (कैकाडी समाज आघाडी राज्य अध्यक्ष) यांचा सत्कार मुकेश जाधव (खान्देश संपर्क प्रमुख) याच्या हस्ते करण्यात आला. अरुण गायकवाड (कैकाडी समाज आघाडी राज्य उपाध्य )यांचा सत्कार संदिप जाधव (जळगांव शहर अध्यक्ष)याच्या हस्ते करण्यात आला.सर्व कैकाडी समाज आघाडी पदाधिकारी तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांचा देखील फुलहार नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा सत्र सुरू झाले त्यात पदाधिकारीनी आपआपल्या भुमिका माडल्या. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष अँड शिरिष जाधव पदाधिकारीकाना मार्गदर्शन करतांना म्हणाले की,
राज्यस्तरीय पतसंस्था स्थापन करणे ,राज्य शासनातर्फे मंगल कार्यालयासाठी जागेची मागणी करणे ,शाळा सुरु झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह कमीटीने जिल्ह्यात विद्यार्थीना मोफत वह्या ,वाट्प करणे, समाजातील प्रत्येकास आधार कार्ड,मतदान कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र करुन देणे व त्यासाठी जिल्हा, तालुका,कार्यकारणीने कॅम्प भरणे,
महिला दिनी महिलांच्या सन्मान करुन महिला दिन साजरा करणे,वसंतराव नाईक महामंडळात समाजाच्या एकमेकाच्या जास्त फाईल्स मंजूर करून घेणे, शासनातर्फे लँपटाँप,मोबाईल, मिळविणे विद्यार्थासाठी,एम पी एस सी . यु पी एस सी, विद्यार्थीचा मेळावा भरुन मार्गदर्शन करणे, संघटनेच्या झेंड्याचा रंग ठरवणे, इतर सदस्यच्या वेळेवरी सुचनावर चर्चा, यानंतर जळगांव जिल्हा पतसंस्थेची पाच (५) सदसीय कमिटीची निवड करण्यात आली. सदर नावे ,डिगंबंर जाधव, प्रतिभा गायकवाड, मालतीबाई जाधव, स्वाती जाधव, हेमकांत गायकवाड
याची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी श्री दिगंबरभाऊ जाधव ( जि. अध्यक्ष जळगाव) श्री. मुकेशभाऊ जाधव ( जळगाव संपर्क प्रमुख) सौ प्रतीभाताई गायकवाड ( जि. अध्यक्ष महिला आघाडी) सौ स्वातीताई गायकवाड ( कार्याध्यक्ष ) सौ मालतीताई गायकवाड ( जळगाव) सौ कलाताई गायकवाड( जळगाव) प्रियंकाताई गायकवाड ( धुळे) मुकेश जाधव जामनेर युवा अध्यक्ष संदिप जाधव जळगाव हेमकांत गायकवाड, किशोर जाधव, दिपक जाधव, विनोद गायकवाड, जगदिश गायकवाड, योगेश गायकवाड, संदिप पंडीत जाधव, सचिन जाधव, जगन जाधव, विष्णू जाधव, राजू गायकवाड, एकनाथ जाधव, मनेश जाधव, नवनाथ जाधव, भगवान जाधव, सुरेश जाधव इत्यादी उपस्थित होते.