वराडसिम येथील कैलास पारधी यांची आमरण उपोषणाला सुरुवात !

0
41

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथील रहिवाशी कैलास नरसिंग पारधी यांनी निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचे जातीचे प्रमाणपत्र तपासणे व इतर कागदपत्रक यांची नक्कल मिळणे तसेच गावातील सभागृहांना देण्यात आलेली नावे तसेच लावण्यात आलेले भोगवटे व इतर विषयांवरील कागदपत्रे मिळण्यासाठी निवेदन दिलेले आहेत. त्यामुळे दि. ८ नोव्हेंबर पासून कैलास पारधी यांनी वराडसिम येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सदर ठिकाणी तालुका पोलीसांनी बंदोबस्त तैनात ठेवला आहे. जो पर्यंत मागणी मान्य होणार नाही. तो पर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचे सांगितले जात आहे.

Spread the love