काकानेचे चुलत पुतण्याना विहरीत ढकलले : काका पोलिसांच्या ताब्यात !

0
16

यावल-: तालुक्यातील चुंचाळे येथील दोघा अल्पवयीन भावंडांचे मृतदेह गुरुवारी दुपारी त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळले होते.सापत्न वागणुकीच्या रागातून चुलत काकानेच या चिमुकल्या पुतण्यांना विहिरीत फेकले असल्याचा उलगडा पोलीस तपासात झाला आहे. पोलिसांनी चौकशीअंती या गुन्ह्याचा उलगडा करीत मुलांच्या चुलत काकाला अटक केली आहे.

आरोपीला कुटुंबात मिळणार्‍या सापत्न वागणुकीमुळे त्याने मुलांना विहिरीत फेकल्याची कबुली दिली. यावल पोलिसांनी आरोपी चुलत काका निलेश सावळे (32) यास अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्याकांडात हितेश व रीतेश रवींद्र सावळे (6) व हितेश रवींद्र सावळे (5) या चिमुकल्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या माता-पित्यांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.

वडिलोपार्जीत शेतीचे उत्पन्न दाखवले जात नाही, नोकरासारखी वागणूक मिळते, बुधवारी सर्वजण जेवायला बसलो तेव्हा मला एकच पोळी दिली, इतर सर्व पोटभर जेवले परत दुपारी दोघा पोरांना जेऊ घातले मला विचारलेदेखील नाही, याचा राग मनात होता. बुधवारी मी शेतातील विहिरीवर बसलो होतो. तेव्हा दोन्ही पोरं विहिरीत दगड टाकत होते. मी त्यांना हटकले तेव्हा त्यांनी मला दगड मारला त्यामुळे संतापात मी दोघांना विहिरीत टाकले ! , अशी कबुली संशयित नीलेश सावळे याने पोलिसांना दिली. संशयिताने कबुली दिल्याने पोलिसांनी विहिरीत पट्टीच्या पोहणार्‍यांच्या माध्यमातून शोध घेतल्यानंतर दोन्ही बालकांचे मृतदेह गुरुवारी दुपारी काढण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी शवविच्छेदन केले. रात्री दोन्ही बालकांवर चुंचाळे येथे अंत्यसंस्कार झाले.

Spread the love