चोपडा:जळगाव शहरातील सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या कला सिद्दी फाऊंडेशन व वृक्ष संवर्धन समितीच्यावतीने पिंप्राळा परिसरातील मुंदडे शाळेत महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले .
यावेळी वर्दीतील पोलिस कलाकार गायक संघपाल तायडे , वृक्षसंवर्धन समितीचे चंद्रशेखर नेवे, कलासिध्दी फाऊंडेशनच्या आरती शिंपी, , मुंदडा शाळेचे मुख्याध्याक डि.एस कुमावत , बाराबलुतेदार च्या भारती कुमावत , ,सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई खोडपे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले..
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलासिध्दी फाऊंडेशनच्या आरती शिंपी यांनी केले .दिवसागणिक होत जाणारा पर्यावरणाचा ऱ्हास पुढील काळात रोखण्यासाठी मुलांच्यामध्ये पर्यावरणा विषयी जन जागृती व्हावी या उद्देशाने शालेय परिसरात वृक्षां रोपण करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याचं म्हटल आहे.अनेक जण विविध प्रकारे आपल्या मित्र मैत्रिणी चा वाढदिवस साजरा करीत असतात, मात्र कलासिध्दी संस्थेच्या सदस्य असलेल्या बेबीताई खोडपे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली व वाढदिवस अश्या प्रकारे साजरा करता येतो असे मुलांना समजावण्यात आले व शहराच्या विविध भागात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आरती शिंपी यांनी दिली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर नेवे यांनी केले,तर जयश्री महाजन यांनी पर्यावरणाचे महत्व या विषयावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले .
आभार प्रदर्शन भारती कुमावत यांनी केले.कार्यक्रम प्रसंगी अनिल खैरनार , सुनिल वानखेडे, भास्कर , भानुदास जोशी , महेश शिंपी , वसंत पाटील , . ॲड वैशाली बोरसे, पूनम सुतार, दिपाली कासार , अलका सोनवणे , पूर्वा , अॅड.नयना झोपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जगदीश बियाणी ,उंबरकर , घ्यारसर , सुनिता पाटील, रंजना चौधरी आदींनी परिश्रम घेतले…