यावल-:तालुक्यातील आडगाव येथील ग्रामपंचायत मार्फत सुरु असलेल्या १५ वित्त आयोगाच्या निधीतुन केलेले पेव्हेर बॉल्कचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे होत आहे. सदर काम २६ ब्रास आहे तर २२ ब्रासच काम केले आहे. काम अपूर्ण आहे तरी टेक्स रिपोर्ट नसतांना बिल निघाले आहे.
हे बिल निघाले कसे ? यामधे ठेकेदार व ग्रामसेवक यांनी खोटे काम दाखवुन बिल काढले आहे का ? याची सखोल चौकशी करून ग्रामसेवक व ठेकेदारवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी किरण सोनवणे व अविनाश अडकमोल यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन आडगाव ग्राम पंचायतीच्या कामाची चौकशी करावी आणि ठेकदार यांच्यावर कार्रवाई करावी अशी मागणी केली आहे.