जळगाव -: तालुक्यातील कानळदा भोकर परिसरातील बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज *शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनावणे यांनी उप वनसंरक्षक ( जळगांव वन विभाग कार्यालय)* यांना निवेदन देताना सांगितले की ऑगस्ट महिन्याच्या सुरुवाती पासूनच कानळदा,भोकर,देवगाव,फूपणी,भादली खुर्द,कठोरा,किनोद,आमोदा,गाडोदा,जामोद,पळसोद,नंदगाव,नांद्रा बुद्रुक,पिलखेडा आदी परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक महिला शेतकरी तसेच तीन गुरे यांना ठार केले आहे अजूनही तो मोकाट आहे,बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांचे शेतातील कामे होत नाही सर्व जण भयभीत झालेले आहेत म्हणून आपण तात्काळ जागोजागी पिंजरे लावून ट्रॅप कॅमेरे बसवावेत,बिबट्याच्या पाऊल खुणाचा मागोवा घ्यावा तसेच रात्री पेट्रोलिंग करावी जेणेकरून भविष्यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी होणार नाही.
बिबट्याला लवकर जेरबंद न केल्यास व त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवित हानी किंवा काही दुखापत झाल्यास त्याला सर्वस्वी वनसंरक्षक विभागातील अधिकारी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी.