जळगाव -:येथील कांचन नगरात जागृत श्री गुरुदत्त मंदिर संस्थान मार्फत दत्त जयंती निमित्त श्रीपद भागवत संगीतमय कथा व कीर्तनी सप्ताहाची सुरुवात मंदिराचे विश्वस्त राजेंद्र कोळी, सौ. अरुणा कोळी यांच्या हस्ते करण्यात आली. श्रीमद भागवत कथाचे निरुपन ह.भ.प.श्री. मनोहर महाराज खोडे करीत आहेत.
https://youtu.be/99UJL4BH2vw
श्री देवाची भक्ती केली व कर्म चांगले असेल तर मनुष्य जीवनात यशस्वी होतो. किर्तनी सप्ताहात ह.भ.प.येदुश्रेष्ठ महाराज, नागेश्वर, ह.भ.प.प्रल्हाद महाराज, कळमसरेकर,ह भ प गजानन महाराज अमोदवर ह भ प शालिग्राम महाराज जळगावकर, ह.भ.प. सुरेश महाराज, सर्वेकर, ह.भ.प.गोपाल महाराज, दोनगावकर ह.भ.प खुशाल महाराज पिपळगावकर, ह.भ.प.गोकुळ महाराज शेळगावकर यांचे कीर्तन आयोजित केली आहेत.काकडा व हरिपाठ, गायनाचार्य सोनू महाराज, धर्मा महाराज, गजानन महाराज, नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज, हे करतील.दैनंदिन कार्यक्रम सकाळी ५ ते ७ काकड आरती, दुपारी २ ते ६ श्रीपद भागवत कथा वाचन संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ८.३० ते ११.०० कीर्तन असे आयोजित केले आहेत. सदरहू कार्यक्रम चे आयोजन दिनांक ०१ / १२ / २०२२ पासून हे दत्त जयंती दि. ०७/१२/२०२२ पर्यंत केले आहेत.अशी माहिती कर्यक्रमाचे आयोजन व विश्वस्त ज्ञानेश्वर कोळी यांनी दिली.










