चाळीसगाव-औरंगाबद महामार्गावरील कन्नड घाटात आमदार मंगेश चव्हाण यांनी स्टींगव्दारे पोलिसांकडून अवैधरीत्या होणार्या वसुलीचा परवाच पर्दाफाश केल्यानंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. यासंबंधीचे पुरावे देखील आमदार मंगेश चव्हाण पोलीस आधिक्षकांना दिले होेते. त्यामुळे अवैधरीत्या वसुली करणार्या चौघां पोलिसांवर जिल्हा पोलीस अधीक्षकानी निलंबन कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.
यात हवालदार गणेश वसंत पाटील, हवालदार प्रकाश भगवान ठाकूर, कॉन्स्टेबल सतीश नरसिंग राजपूत, कॉन्स्टेबल संदीप भरत पाटील यांचा समावेश आहे. याबाबत अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपटे यांना विचाराना केली असता, त्यांनी दुजोरा दिला आहे. परंतू चाळीसगाव ग्रामीण स्टेशनमधील आधिकार्यांवर कारवाई न केल्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांची आता काय ? भूमीका राहणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











