धानोरा -जळगाव तालुक्यातील धानोरा खुर्द येथील जिल्हा परिषद केंद्र येथे 297 लसीचे डोस देण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी युवराज सोनवणे. तथा वैद्यकीय अधिकारी कर्मचारी , जळगाव पंचायत समिती चे सभापती सौ ललिता जनार्दन कोळी यांनी नागरिकांना लसीकरणाबाबत माहिती दिली. तथा नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन केले. या प्रसंगी जनार्धन भाऊलाल कोळी ,धानोरा गावाचे लोकनियुक्त सरपंच सौ भारती देवेंद्र पाटील , सरपंच पती देवेंद्र रमेश पाटील, जेडीसीसी बँक शाखेचे व्यवस्थापक रमेश पाटील, अर्जुन पाटील- पोलीस पाटील धानोरा, रवी महाजन ग्राम सेवक ग्रुप ग्रामपंचायत धानोरा,आदी मान्यवर उपस्थित होते. लस उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी सरपंच आणि मान्यवरांचे आभार व्यक्त केले. आणि गावामध्ये शिस्तीने लसीकरण पार पडले यात गावातील नागरीकांचे सहकार्य लाभून गोंधळ किंवा कुठलीही तक्रार न आल्याने, जवळ जवळ 80% धानोरा गावाचे लसीकरण झालेले एकमेव गाव असल्याने सरपंच भारतीताई पाटील यांनी गावातील लोकांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केले.










