कर्णधार कार्तिकी सह महिला खेळाडूंचा सत्कार संपन्न… चोपडा तेली समाजाचा उपक्रम

0
33

हेमकांत गायकवाड

चोपडा: अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब चा मुलींचा संघ अमरावती येथे उपविजेता ठरला. या संघातील सहा खेळाडूंना 20वी जूनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत समाविष्ट करण्यात आले आहे. राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत राज्य संघाचे कर्णधारपदी चोपडा येथील कुमारी कार्तीकी अनंत चौधरीची निवड झाली. त्याबद्दल चोपडा तेली समाजाला आनंद झाला असून कुमारी कार्तिकीचा सत्कार श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांचे संयुक्त विद्यमाने , श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे. दि.17/9/2021 रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हाध्यक्ष तथा चोपडा तेली समाजाचे अध्यक्ष के. डी. चौधरी सर होते .प्रमुख अतिथी म्हणून कार्तिकीचे आजोबा मोतीलाल पौलाद चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुशीलाबाइ मोतीलाल चौधरी, आदर्श शिक्षक अशोक माणिकराव साळुंखे ,आदर्श शिक्षिका सौ. ललिताताई अशोकराव साळुंखे ,आदर्श शिक्षक संजय बारी सर ,अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब चे संचालक व टेनिस बॉल क्रिकेट चे कोच सर्वश्री राजेंद्र अल्लाड, मनोज जाधव ,ललित सोनवणे, विजय पाटील हे उपस्थित होते. यावेळी राज्य आदर्श शिक्षक टी. एम. चौधरी सर यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कार्तिकी व तिच्या सोबत असलेल्या कामिनी पाटील, वैष्णवी पाटील, शरयू बाविस्कर, अंकिता पाटील, वेदश्री पाटील, गार्गी पाटील ,पूजा पाटील, प्राजक्ता चौधरी, एकता पाटील, योगिता पाटील या संपूर्ण टीमचा गौरव केला. चोपडाचे नावलौकिकात या सर्वांनी भर घातली असून अष्टविनायक क्लबने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. या वेळी सुरुवातीला हरिपाठाच्या निमित्ताने ह.भ.प .गोपीचंद महाराज यांचे मार्गदर्शनाखाली संताजी जगनाडे महाराज मंदिरात आरती करण्यात आली. आरती चे मानकरी शिवाजी दगडू चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ गायत्री शिवाजी चौधरी तसेच किशोर भागवत पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सौ.ज्योती किशोर पाटील , आदर्श शिक्षक अशोक माणिकराव साळुंखे व आदर्श शिक्षिका सौ ललिता ताई अशोक साळुंखे तसेच कार्तिकी ,मोतीलाल पौलाद चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुशीलाबाइ मोतीलाल चौधरी यांचे शुभहस्ते आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मान्यवरांचे स्वागत प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी यांनी केले .यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना के. डी. चौधरी सर म्हनाले की,चोपड्यातील महिला मुली या सर्व क्षेत्रात आघाडी घेत आहेत. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षक व शिक्षकांचे ,आदर्श शिक्षकांचे कार्याचा गौरव केला त्यांनी केला. कार्तिकी मुळे तेली समाजाला आनंद झाला असून ती आणि तिच्या टीमला शुभेच्छा देत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. यावेळी मुलींसाठी त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा हे घेत असलेल्या मेहनती बद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी कार्तिकीचा, तिच्या टीमचा, तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा, कार्तिकीच्या आजी-आजोबांचा ,पालकांचा ,आदर्श शिक्षकांचा तेली समाजातर्फे भव्य दिव्य सत्कार संपन्न झाला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री नारायण पंडित चौधरी, संजय कौतिक चौधरी, नंदू गोविंदा चौधरी,देवकान्त के. चौधरी ,तसेच ह.भ.प. ज्ञानेश्वर राजाराम नेरकर, प्रकाश श्रावण चौधरी, जितेंद्र प्रकाश चौधरी, मदन मिस्त्री ,जगदीश मिस्त्री ,श्रीमती रेखा पाटील , ,श्रीमती भावना चौधरी, श्रीमती दिपाली चौधरी, सविता बाविस्कर , श्रीमती नम्रता चौधरी ,योगिता चौधरी आदी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा या संस्थेतर्फे सन 2021 या वर्षात दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षकांचा संताजी सेवा पुरस्कार सौ. ललिता ताई अशोकराव साळुंके यांना प्रदान करण्यात आला .शिक्षकाची सेवा करत असताना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष देवकांत के. चौधरी यांनी नम्रपणे नमूद केले. यावेळी आदर्श शिक्षक ,संजय बारी सर, आदर्श शिक्षक अशोकराव माणिकराव साळुंखे व त्यांच्या धर्मपत्नी आदर्श शिक्षिका सौ ललिता ताई अशोकराव साळुंके यांचा भावस्पर्शी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना साळुंखे सर यांनी चोपडे तालुक्यासाठी ज्यानी ज्ञानाची गंगा आणली असे आदरणीय दादासाहेब डॉक्टर सुरेश पाटील व महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एडव्होकेट संदीप सुरेश पाटील यांना ह्या पुरस्काराचे श्रेय असल्याचे नमुद केले . यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अशोक साळुंके सर ,संजय बारी सर यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला .आभार नारायण पंडित चौधरी यांनी केले.

Spread the love