प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील खंडाळा येथील देवगिर बाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि ग्रामपंचायत कार्यालय खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 134 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच सौ. मीराताई पाटील तसेच पोलीस पाटील श्री रतीलाल चौधरी, मनोहर सुरवाडे , बी . सी. पाटील, पि. के. चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी एम ए पाटील यांनी बाबासाहेब यांच्या जीवन चरित्र विषयी बोलताना बाबासाहेब आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतीय संविधानाचे जनक होत. त्यांनी समाज बांधवांना शिका, ,,,,,,.संघटित व्हा, आणि संघर्ष करा हा मोलाचा संदेश दिला. अध्यक्षस्थानी नितीन पाटील होते. याप्रसंगी जनार्दन बापू, एन.आर. पाटील, रमेश शेठ, प्रकाश यादव पाटील ,वसंत नाटू पाटील, नथू यशवंत महाजन, जगन्नाथ कोळी, गोपाळ कोळी, विनोद सुरवाडे, गजू, सुरवाडे, संजय सुरवाडे, पंडित सुरवाडे, अनिल पाटील, जय विजय, नारायण पाटील ग्रामसेवक ऋषिकेश चौधरी, मुरलीधर धनगर, भीमराव शेठ त्याचप्रमाणे बहुसंख्य संख्येने ग्रामस्थ बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन एम ए पाटील यांनी तर आभार प्रदर्शन एन.आर. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.