जळगांव – : शहर पो.स्टे. शिवाजी नगर हुडको भागात दि.०४/०४/२०२१ रोजी रात्री २०.०० वा. मुसेफ उर्फ संभा शेख इसाक वय ३७ रा. शिवाजी नगर हुडको जळगांव याचा तेथील रहिवाशी अझरुचिन उर्फ अज्जु शेख रा. शिवाजी नगर हुडको जळगांव यांचा जुन्या वादाचे कारणावरुन अझरुद्दीन उर्फ अज्जु याने त्याचे जवळील तिक्ष्ण चाकुने वार करुन मुसेफ उर्फ संभा शेख इसाक याचा खुण केल्याने जळगांव शहर पो.स्टेला गुरन – ८५/२०२२ भादंवि कलम ३०२ प्रमाणे दाखल आहे.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. प्रविण मुंढे सो, मा. अपर पोलीस अधिक्षक सो श्री. चंद्रकांत गवळी, मा.पोलीस उपअधिक्षक सो श्री कुमार चिंथा जळगाव भाग जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले सो यांना सदर आरोपीचा लवकरात लवकर शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने त्यावरुन स्वता घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन टिमसह घटनास्थळी रवाना होऊन सदर गुन्हयातील आरोपीताचा शोध घेण्याकरीता स्था. गु. शाखा कडील घटनाळस्थळीच पोउपनिरी सुधाकर लहारे,सफी / अशोक महाजन, पोहेकॉ/ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, पोना / प्रितम पाटील, राहुल पाटील चालक पोकॉ मुरलीधर बारी अशांचे पथक तयार करुन सदर आरोपीचा शोध घेणेकरीता जळगांव शहरात रवाना केले सदर पथकाने गुप्त बातमीदाराकडुन माहिती काढुन सदर गुन्हयातील आरोपी नामे अझरुधिन उर्फ अज्जु शेख हा शिवाजी नगर भागातील धनाजी काळे नगर भागातुन तो पळून जात असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथकाने जळगांव शहरातील शिवाजी नगर, गेंदालाल मिल, धनाजी काळेनगर सापळा लावुन सदर आरोपीतास अतिशय शितीफिने धनाजी काळे नगर भागात पकडले त्यास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव अझरुचिन उर्फ अज्जु शेख अलीमोद्यीन वय ३२ रा. शिवाजी नगर हुडको जळगांव असे सांगितले व सदर आरोपीतांने गुन्हा केल्याची कबुली दिली असुन सदर आरोपीतास पुढील कारवाई कामी जळगांव शहर पो.स्टेला हजर केले आहे.