किनवट चे पत्रकार आनंद भालेराव यांचा जिल्हाअध्यक्ष नागेलीकर यांच्या उपस्थित काँग्रेस पक्षप्रवेश

0
53

प्रतिनिधी  –  मारोती देवकते

किनवट  – डिजिटल सदस्य नोदणी जास्तीत जास्त करण्याचे नागेलीकर यांनी कार्यकर्त्यांना केले अवाहन     आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे पाटील नागेलीकर यांच्या हस्ते तसेच किनवट ता.अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी व माहूर ता.अध्यक्ष संजयभाऊ राठोड,राजेंद्र केशवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार आनंद भालेराव यांचा भाजपातून काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने डिजिटल सदस्य नोंदणी मोहीम सुरू असून या निमित्य जिल्हाअध्यक्षा चा अध्यक्षतेखाली माहूर येथील कपीलेश्वर धर्मशाळेत पदाधिकारी व कार्यकर्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष नागेलिकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री व पालकमंत्री अशोकराव चव्हाण व प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील नांदेड जिल्ह्यातील डिजिटल सदस्य नोंदणी अभियान सुरु असून नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त डिजिटल सदस्य नोंदणी करून नांदेड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आव्हान केले.

या प्रसंगी काँग्रेस नेते यादवराव जाधव,किनवट ता.अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, माहूर ता.अध्यक्ष संजयभाऊ राठोड,माजी नगराध्यक्ष माहूर राजेंद्र केशवे,किसनराव राठोड,ईश्वर चव्हाण, निरंजन केशवे,गिरीश नेमानीवार,जवाद आलम, आनंद तुपदळे,जयकुमार अडकीने,फारुख चव्हाण, प्रीती मुनेश्वर, शेख शहेनज, शेख परवीन, जयश्री भरणे,डॉ. तौफिक,राहुलवार सर, व पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love