किशोर पाटील यांचे मोठे वक्तव्य! अडचण आली तर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढू …

0
45

जळगाव – पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी वादात अडकलेले मिंधे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एक मोठं वक्तव्य केलं आहे. जर आम्हाला काही अडचण आली व गरज पडली तर भाजपच्या चिन्हावर देखील आम्ही निवडणूक लढू, असे किशोप पाटील यांनी सांगितले आहे.

‘महाराष्ट्रात धनुष्यबाण व शिवसेना आमची आहे हे सिद्ध झालं आहे. निवडणूक आयोगाने तसा निर्णय दिला आहे. पण जर काही तांत्रिक अडचण आली तर कदाचित असा निर्णय होऊ शकतो की आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढू’, असे किशोर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

 

Spread the love