अमळनेरमधील कोळी जमातीचा तिव्र अन्नत्याग सत्याग्रह सुरुच..

0
12

जगन्नाथ बाविस्करांची तब्बेत खालावण्यास सुरुवात.प्रशासन सुस्त

चोपडा – अमळनेर उपविभागीय प्रांत कार्यालयाकडे आदिवासी कोळी जमातीचे जात प्रमाणपत्रांचे प्रस्ताव प्रदीर्घ काळ प्रलंबित असणे कायद्याला धरून नाही. घटनेने दिलेल्या अधिकाराचा लाभ मिळण्यासाठी जमात प्रमाणपत्र हे साधन आहे. आमचे घटनात्मक अधिकार मिळविण्यासाठी सातत्याने आंदोलने, उपोषणे करावे लागतात. ही बाब प्रशासनाला अशोभनीय आहे. आदिवासी कोळी जमातीच्या घटनात्मक अधिकारांसाठी आमचा लढा सुरूच राहील. आम्हाला अनुसूचित जमातीच्या टोकरे कोळीचे जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र मिळावे, ही मागणी रास्त व सांविधानिक आहे. आमच्याकडे सर्व प्रकारची कागदपत्रे उपलब्ध असताना संबंधित विभाग आम्हाला आमच्या हक्कांपासून वंचित ठेवत आहेत. आमच्या सहनशीलतेचा अंत होत आहे. जोपर्यंत आम्हाला प्रलंबित प्रकरणांचे टोकरे कोळी (एसटी) चे जात प्रमाणपत्र मिळत नाहित व त्यासोबत इतरही मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमचा तीव्र अन्नत्याग सत्याग्रह सुरूच राहील. त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, अशी स्पष्टोक्ती अमळनेर येथील प्रांत कार्यालयासमोर दि. ८ मे पासून सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रमुख संकल्पक जगन्नाथ बाविस्कर, मार्गदर्शक लखिचंद बाविस्कर चोपडा, अमळनेर कोळी महासंघ व कोळी समाज पंच मंडळाचे पदाधिकारी यांनी ह्या पत्रकान्वये केलेली आहे.

Spread the love