चोपडा (प्रतिनिधी):-अमळनेर व चोपडा तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरे कोळी (एसटी) चे दाखले सुलभपणे मिळावेत यासाठी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांनी शेकडो समाज बांधवांसह व शालेय विद्यार्थ्यांसह चोपडा प्रांत अधिकारी कार्यालयासमोर दि. ९/८/२०२३ पासून तीव्र अन्नत्याग सत्याग्रह व ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्याप्रसंगी तालुका व जिल्हाभरातील चारशे पेक्षाही जास्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अन्नत्याग सत्याग्रहाला भारतीय आदिवासी कोळी सेना, आदिवासी वाल्मिकलव्य सेना माजी आमदार व तापी सुतगिरणीचे अध्यक्ष कैलास पाटिल, संचालक..तुकाराम पाटिल, प्रल्हाद पाटिल, रमाकांत पाटिल.यांनी जाहिर पाठिंबा दिला आहे. त्यात प्रामुख्याने लखिचंद बाविस्कर, योगेश बाविस्कर, डी. पी. साळुंखे सर, Ad.गणेश सोनवणे, माजी सैनिक नामदेवराव येळवे, Dr.गोकुळ बिर्हाडे,हआनंदराव रायसिंग, गुलाब बाविस्कर, भरत बाविस्कर, भाईदास बाविस्कर, कैलास सोनवणे, अनिल कोळी, कैलास बाविस्कर, छगन देवराज साहेब, किशोर कोळी, भावलाल कोळी, योगेश कोळी, हिंमतराव पाटिल, अतुल ठाकरे, शेखर पाटिल, हिरालाल पाटिल, दिपक पाटिल, कोमलताई पाटील, पमाताई पानपाटिल, शारदा महाले, काजल कोळी, डी. पी. पाटील, अरुण कोळी, भुषण कोळी अमळनेर, विजय बाविस्कर, मोतीलाल रायसिंग, भगवान कोळी, भरत बाविस्कर, गोपाल बाविस्कर, प्रशांत सोनवणे, लक्ष्मण बाविस्कर, पंकज रायसिंग, भाऊसाहेब बाविस्कर, गजानन कोळी, दिनकर सपकाळे, संतोष देवराज, आबा मिस्तरी, दुर्गेश कोळी, जितेंद्र कोळी, संदिप कोळी, समाधान कोळी यांचेसह शेकडों समाजबांधव उपस्थित होते.