कोळपणी करत असतांना विदगाव येथील पुरुषोत्तम दगडू कोळी यांच्या बैलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

0
43

जळगाव -: तालुक्यातील विदगाव शिवारात एका शेतामध्ये कोळपणी करत असतांना येथील पुरुषोत्तम दगडू कोळी यांच्या बैलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर असे कि विदगाव येथील पुरुषोत्तम  कोळी हे भाड्यापोटी दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करत असतात. आज देखील येथीलच एका शेतकऱ्याच्या  शेतामध्ये बैल जोडी घेऊन शेतीची कोळपणी करण्यासाठी गेले असता शेतात असलेल्या विद्युत खांबामध्ये वीज प्रवाह उतरल्याने त्या खांब्यास बैलाचा धक्का लागल्याने पुरुषोत्तम कोळी यांचा बैल जागीच मृत्यू झाला सुदैवाने शेतकरी व दुसरा बैल यांचे प्राण वाचले. मात्र आपला उदरनिर्वाह करणाऱ्या बैल जोडीमधील एक बैल मरण पावल्याने त्यांचे अश्रू अनावर झाले. एक बैल विजेच्या धक्क्याने मरण पावल्यामुळे पुरुषोत्तम कोळी यांच्यापुढे पोट भरण्याचा प्रश्न उपस्थित झाला. एक बैलाने शेती करता येऊ शकत नाही किंवा रोजंदारीने जाता येणार नाही म्हणून त्यांनी विद्युत महामंडळाकडे नुकसान भरपाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Spread the love