कृषिभूषण हिरालाल पाटील यांचा स्तुत्य उपक्रम शेतकऱ्यांना घरपोच ऑरगॅनिक/सेंद्रिय खते पुरविणाऱ्या “त्रिमूर्तींचा” सत्कार

0
10

प्रतिनिधी – जगन्नाथ बाविस्कर

चोपडा –  तालुक्यातील गुर्जर समाजाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक,जि.प.चे माजी प्रभारी अध्यक्ष छन्नु झेंडु पाटील  यांचे चिरंजीव कृषिभूषण हिरालाल पाटील (प्रगत शेतकरी कुरवेल) हे त्यांच्या निवासस्थानी येणारे विशेष अतिथी यांचा मानसन्मान करतात.शेती मातीची सेवा करतांना हिरालाल पाटिल घरपरिवाराचे संस्कारही जोपासतात.म्हणुनच त्यांना कृषिभूषण हा पुरस्कार मिळाला आहे.अशाचप्रकारे तालुक्यातील शेतकऱ्यांना अल्पदरात घरपोच ऑरगॅनिक सेंद्रिय खते पुरवणारे चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक), सुरेश पाटील (शहादा), राजाराम पाटील (धुळे) या त्रिमूर्तींचाही कृषिभूषण हिरालाल पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी औक्षण करून शाल-श्रीफळ देऊन यथोचित स्वागत व सत्कार केला.

शेतीत नवनवीन अभिनव उपक्रम करून कृषिभूषण हिरालाल पाटील तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत.सध्या महागडी रासायनिक खते, किटक व तणनाशके यामुळे शेतीचा पोत खराब होत आहे.शेतकऱ्यांनी पिकांना कमी खर्चात ऑरगॅनिक सेंद्रिय जैविक खते वापरून अधिक उत्पादन घेतले पाहिजे.या उद्देशाने वेलसन फार्मर कंपनी शेतकऱ्यांना ऑरगॅनिक सेंद्रिय खते घरपोच पुरवीत आहेत.नोंदणी व वितरण व्यवस्था वैभवराज बाविस्कर (चोपडा,मोबा.नं. ९०११८१०५०८), मनोहर पाटील (गोरगावले बु) हे सांभाळत आहेत.प्रामुख्याने कुरवेल, कमळगांव, वडगांव बु., गोरगांवले बु., हातेड बु., हातेड खु., घोडगांव, विटनेर, गरताड, कठोरा, नांदेड, येथील शेतकरी ह्या खतांचा प्रत्यक्ष वापर करीत आहेत.तसेच तालुक्यातील इतरही गांवातील शेतकऱ्यांनी ह्या खतांसाठी नोंदणी केलेली आहे.अशी माहिती गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर सेंद्रिय शेती करणे हि काळाची गरज आहे.

शेतकऱ्यांनी विषारी रासायनिक खतांऐवजी अमृततुल्य ऑरगॅनिक खते वापरली पाहिजे.कारण यापुढे ऑरगॅनिक सेंद्रिय जैविक शेती करणे काळाची गरज झालेली आहे.मार्केटचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी घरपोच सेंद्रिय खते पुरविण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असुन उपक्रमशील शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा.

कृषिभूषण हिरालाल पाटील प्रगत शेतकरी,कुरवेल ता.चोपडा

Spread the love