प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे औट पोष्ट ला पोलीस उप निरिक्षक संजय कंखरे यांनी कार्यभार सांभाळला आहे. यावेळी तालुका पोलीस स्टेशन चे पो नि महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि संजय कंखरे यांनी पोलीस पाटील यांची सभा घेऊन या सभेत आगामी सण उत्सव व जयंती तसेच यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस पाटील यांची भुमीका महत्वाचे असल्याचे सांगीतले.
यावेळी पो काँ उमेश बारी, योगेश पालवे तसेच होमगार्ड उपस्थित होते यावेळी पोलीस पाटील उपस्थित होते. या प्रसंगी पोऊनि संजय कंखरे व योगेश पालवे , उमेश बारी यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी पत्रकार योगेश गांधेले व पत्रकार जितेंद्र काटे उपस्थित होते.