कुऱ्हा पानाचे बसस्थानक चौकात तिसऱ्या डोळ्याची नजर !

0
32

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथे ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून गावातील बसस्थानक चौकात जवळपास १० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत नुकतेच दि.११ रोजी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोनि महेश गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुऱ्हा पानाचे औटपोष्ट चे पोऊनि संजय कंखरे , पो काँ उमेश बारी , माजी जि प सदस्य समाधान पवार , सरपंच दुर्गाबाई शिंदे, माजी सरपंच सुरेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य जिवन पाटील, रामलाल बडगुजर , सावकार पारधी, ग्रामविकास अधिकारी संतोष मोरे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोनि महेश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला तसेच बसस्थानक चौकात आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने एखादी घटना घडली किंवा चोरीच्या घटना उघडकिस आणण्यासाठी मदत होणार असल्याने गावागावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे असल्याचे पोनि महेश गायकवाड यांनी सांगितले.

Spread the love