प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील शहीद जवान राकेश शिंदे यांना भुसावळ येथील नाहाटा कॉलेज चौफुली जवळील स्मारकाला तसेच भुसावळ येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला नुकतेच शहीद राकेश शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या प्रतिमेला गुरूवार दि. २७ रोजी त्यांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
शहीद जवान अमर रहे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, भुसावळ नगरपालिकेचे मुख्य अधिकारी राजेंद्र फातले, उपमुख्याधिकारी परवेज शेख व नगरपालिका अधिकारी , कर्मचारी व कुऱ्हे पानाचे येथील आजी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.
सन १९९९ मध्ये कारगिल युध्दात कुऱ्हे पानाचे (ता. भुसावळ) येथील भारतमातेचे सुपुत्र राकेश शिंदे यांनी मातृभुमीचे रक्षण करतांना बाजी लावली व शत्रुला परतावून लावण्यात आपले योगदान दिले.
१९९५ साली १७ मराठा बटालियन मध्ये ते देशसेवेसाठी भरती झाले. त्यांचे लहाणपणीच पितृछत्र हरपले होते. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेउन मातृभुमीच्या सेवेसाठी सैनिकांत नोकरी पत्करली. व दि. २७/०२/२००० जम्मु पुंछ सेक्टर कारगिल युध्दात त्यांना वीरमरण प्राप्त झाले.