प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – येथून जवळच असलेल्या कुऱ्हा पानाचे गावा जवळील जामनेर रोड वरील हाॅटेल राजगड समोर दि.१३ मार्च रोजी सकाळी ११:१५ वाजता एम एच २० ईएल ८४६७ या आयशर गाडीतील वस्तूंना अचानक आग लागली हे समजताच भुसावळ तालुका पोलीसांनी तात्काळ भुसावळ फायर ब्रिगेड व जामनेर फायर ब्रिगेड यांना कळविले त्यामुळे आग आटोक्यात आणली त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही वाहन चालक उमेश रमेश जाधव रा. हातनूर ता. कन्नड जिल्हा. संभाजीनगर यांने आयशर गाडीतून उडी मारली त्यामुळे जिव वाचला. वाहन असलेल्या ट्रान्सपोर्ट चे सुपरवायझर अरविंद उत्तम खंडारे यांना विचारपूस केली असता आयशर गाडीत इंडस्ट्रीज मटेरियल, सिलेंडर, इतर उद्योग वस्तू असा माल असल्याचे समजते.घटनास्थळी पोलीस व गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केले तसेच पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पानाचे औट पोष्टचे पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत.












