प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील ग्रामपंचायत कार्यालयात युवकांनी एकत्रीत येत विकासकामे करण्या ऐवजी आंदोलने करण्यात येत असल्याने व गावाचा विकास ठप्प होत असल्याने दांगडो केल्याने सरपंच पती यांनी काढता पाय घेतला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले असून या बाबत चा व्हिडीओ कुऱ्हा गावात अनेकांच्या मोबाईलवर दिसत आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की अनेक दिवसांपासून कुऱ्हा पानाचे ग्रामपंचायत चर्चेत असून गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनावर निवेदने दिली जात असून ग्रामपंचायत सदस्य ‘ आधे इधर आधे उधर ‘ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे की काय ? गावाचा विकास ठप्प होण्याच्या मार्गावर असून सरपंच पदाचा कार्यकाळ वाटून घेतलेला असल्याने आपल्या काळात जास्तीचे कामे व्हावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना ग्रामविकास अधिकारी प्रकरण गाजवीले जात आहे याचाच परिणाम की काय ? दि.७ नोव्हेबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास खळवाळी भागातील अनेक रहिवाशी युवक एकत्रीत आले आणि त्यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली त्यावेळी सरपंच पती प्रमोद उंबरकर यांनी युवकांना समजवण्याचा प्रयत्न ही केला मात्र खळवाडी भागातील नमुना नं ८ च्या विषयावर सरपंच व काही सदस्य पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याने खळवाडी परिसरातील युवक चांगलेच चिडलेले दिसले.
या युवकांच्या प्रश्नांना उत्तरे देता येत नसल्याने तसेच युवक चिडलेले असल्याने सरपंच पती प्रमोद उंबरकर यांनी काढता पाय घेतल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत असून सरपंच व काही सदस्य रिकामे राजकारण करत असून गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावे अशी मागणी सुज्ञ ग्रामस्थांनी केली आहे.