चाळीसगाव -तालुक्यातील खडकी ब्रु. ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचासह ग्रामसेवकांनी एलएडी बल्ब शासन निर्णयानुसार खरेदी न करता कोटेशन पध्दतीने खरेदी करून सव्वा दोन लाखांचा अपहार केल्याचे उघड झाले. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला सरपंचासह ग्रामसेवकावर गुन्हां दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच मिराबाई आनंदा जाधव, ग्रामसेवक विजय रघुनाथ चौधरी व ग्रामसेवक ईश्वर शांतीलाल भोई आदींनी संगनमताने एलएडी. बल्ब हे शासन निर्णयानुसार खरेदी न करता कोटेशन पध्दतीने खरेदी करून ग्रामनिधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून २ लाख ३४ हजार ५२० रूपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.
सदर एल.ए.डी. बल्बची खरेदी ३ डिसेंबर २०१५ ते ६ नोव्हेंबर २०१७ रोजी दरम्यान केलेली आहेत. याप्रकरणी सहायक गटविकास अधिकारी अजितसिंग पवार ( पंचायत समिती चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम ४२०,३४ प्रमाणे शासकीय निधीचा अपहार करून, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले हे करीत आहे.