कोळी जमातीला गैरआदिवासी म्हणणाऱ्या संघटनांवर कायदेशीर कारवाई करावी

0
13

तालुका प्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांच्यासह शेकडों कोळी बांधवांची मागणी.

चोपडा – वर्षानुवर्षांपासून आदिवासी कोळी जमातीला त्यांच्या न्याय, हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र शासन, प्रशासन, राजकारणी व इतर आदिवासी संघटनातर्फे सुरूच आहे. नुकतेच अमळनेर प्रांत कार्यालयासमोर चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे जातप्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे, यासाठी आपल्या शेकडों समाज बांधवांसोबत तीव्र अन्नत्याग सत्याग्रह केला होता. त्यानुसार संबंधित विभागातर्फे कोळी लोकांना तसे दाखले मिळत असतांना जय रावण प्रतिष्ठान व जय आदिवासी युवा शक्ती संघटना ह्यांनी विरोध दर्शवित चोपडा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात, “जळगाव जिल्ह्यातील स्वतःला टोकरेकोळी म्हणवुन घेणाऱ्या गैरआदिवासी समाजाला अनुसूचित जमातीचे जातप्रमाणपत्र देण्यात येऊ नये,” असे म्हटले आहे. ह्या संघटनांचा कोळी लोकांतर्फे निषेध केला जात आहे. अशी माहिती कोळी युवा कार्यकर्ते अनिलराव कोळी (कोळंबा) यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.

घटनादत्त अधिकारानुसार कोळी हि आदिम जमात असून सन १९५० पूर्वीपासून येथे वास्तव्यात आहे. असे असताना,” कोळी जमातीला अनु. जमातीचे दाखले देऊ नका,” असे म्हणणाऱ्या इतर आदिवासी संघटना शासकीय अधिकारी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे भारतीय दंड संहितेचे कलम ३५३, ४९९ व ५०० प्रमाणे गुन्हा आहे. इतर आदिवासींपैकी काही लोक मध्यप्रदेश, गुजरात मधून स्थलांतरित झालेले असून महाराष्ट्रात आदिवासींच्या योजनांचा लाभ घेत आहेत. परंतु कोळी समाजाने इतर आदिवासींचा कधीच विरोध केला नाही. असे असतांना त्यांच्या काही संघटना मुद्दामहून कोळी जमातीला गैरआदिवासी संबोधुन अवहेलना करित आहेत. म्हणुन जय आदिवासी युवा शक्ती संघटनेचे अध्यक्ष अमित तडवी व जय रावण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल पारधी यांचेसह त्यांच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे नोंद होऊन त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन चोपडा तहसीलदार अनिल गावित, शहर पोलीस स्टेशनचे पी.आय. के. के. पाटील यांना देण्यात आले. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी मंत्री, जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिकारी, अमळनेर प्रांताधिकारी यांनाही पाठविलेल्या आहेत.

निवेदनावर आदिवासी कोळी जमातीचे पदाधिकारी जगन्नाथ बाविस्कर, योगेश बाविस्कर, कैलास सोनवणे, गोकुळ बिऱ्हाडे, अनिल कोळी, भाईदास कोळी, कैलास बाविस्कर, दिनकर सपकाळे, दीपक कोळी, मयूर कोळी, आकाश कोळी, विशाल कोळी, विकास कोळी, निलेश कोळी, गोकुळ पाटील, बन्सी बाविस्कर, दीपक कोळी, अशोक बाविस्कर, भीमराव कोळी, आकाश कोळी, सुनील कोळी, गजानन शिरसाठ, शांताराम सपकाळे, कैलास सोनवणे, संदीप कोळी, नवल देवराज, सागर साळुंखे, प्रवीण कोळी, बाळू कोळी, तोषराज कोळी, योगराज कोळी, नरेंद्र कोळी, ईश्वर कोळी, समाधान कोळी, अनिल शिरसाठ, योगेश कोळी, महेंद्र कोळी, यशोदीप कोळी, विशाल कोळी, रामकृष्ण कोळी, सचिन कोळी, नामदेव कोळी, अशोक कोळी, राजेंद्र कोळी, लक्ष्मण कोळी, भगवान कोळी, मच्छिंद्र कोळी, अनिल कोळी, शरद कोळी, मोतीलाल बाविस्कर, ज्ञानेश्वर इंगळे, किशोर कोळी, रवींद्र बाविस्कर, शांताराम कोळी, रामचंद्र कोळी, दीपक बाविस्कर, भिका बाविस्कर, विशालराज बाविस्कर, उमाकांत कोळी, नमन कोळी, सोमनाथ बाविस्कर, चेतन बाविस्कर, वाल्मीक कोळी, किशोर कोळी, प्रवीण कोळी, लीलाधर कोळी, पितांबर बाविस्कर, मंगल कोळी, गोकुळ बिराडे, विजय बाविस्कर, मच्छिंद्र कोळी, महेंद्र बाविस्कर, भाऊसाहेब बाविस्कर, दिनेश सपकाळे, धीरज बाविस्कर, प्रशांत सोनवणे, दिलीप सपकाळे, राजेंद्र शिरसाठ, अनिल कोळी, विशाल कोळी, विलास बाविस्कर, सोमनाथ कोळी, राकेश रायसिंग, अभिजीत कोळी, दिलीप बाविस्कर, सोपान कोळी, अजय कोळी, जयराम ठाकरे, समाधान कोळी, वासुदेव कोळी, बळीराम कोळी, सागर कोळी, झेंडू कोळी, गजानन कोळी, प्रदीप कोळी, आशिष सपकाळे, जयेश कोळी, हर्षल कोळी, जयेश कोळी, चेतन कोळी, प्रदीप कोळी, आशिष सपकाळे, कमलाकर कोळी आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Spread the love