साकळी – येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मारकाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक नागो पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी,सामाजिक कार्यकर्ते कांतिलाल बिराडे, समाजाचे अध्यक्ष प्रकाश भालेराव,उपाध्यक्ष सुकलाल बिराडे, तसेच ग्रामपंचायतीची कर्मचारी भागवत बिराडे यांचेसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.












