लव मॅरेज केल्याच्या रागातून मामाचा भाचीवर तीष्ण हत्याराने वार

0
50

यावल -: बालपणापासून सांभाळ केल्यानंतर भाचीने पळून जावून लव्ह मॅरेज केल्याने राग आल्याने संतप्त होत मामाने भाचीवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना यावल तालुक्यातील पिंप्री गावात घडली आहे.

या हल्ल्यात भाची गंभीर जखमी झाली असून मामाला पोलीसांनी अटक केली आहे.

यावल तालुक्यातील पिंप्री गावामध्ये चेतन वासुदेव कोळी या तरुणासोबत लव्ह मॅरेज करून वैष्णवी विनोद तायडे (18) गावात आली होती. त्यानंतर गावातच स्वप्निल सपकाळे याच्या घरात ती काही दिवसापासून राहत होती. याबाबत माहिती मिळताच शनिवार (दि.8) रोजी सकाळी 8:30 वाजता भाचीने लव्ह मॅरेज केलेच्या राग आल्याने युवतीचा मामा उमाकांत चिंधू कोळी (राहणार पाडळसा ता.यावल) याने लहानपासून सांभाळ केल्यानंतर प्रेमविवाह करते असा संताप व्यक्त करत केळी कापण्याच्या तीष्ण हत्याराने भाचीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत युवतीची त्याच्या तावडीतून सुटका करून रुग्णालयात दाखल केले आहे. उमाकांत चिंधु कोळी याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Spread the love