महेलखेडी येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक पार पडली.।

0
47

दिपक नेवे

आज दि.०६/१०/२१ वार सोमवार रोजी महेलखेडी येथे शाळा व्यवस्थापन समिती निवडणूक पार पडली. शाळा व्यवस्थापन समितीची निवडणुकीमध्ये आलिशान युनुस देशमुख, जरीना रज्‍जाक तडवी, संगीता चंद्रकांत जवरे उमेदवार बिनविरोध निवडून आले..

मतदानाद्वारे अब्दुल फत्तु देशमुख, प्रियंका नंदकुमार महाजन, लतीफ नसीर तडवी, रेखा नशिर तडवी, गनी अब्‍बास पटेल वरील सर्व उमेदवार चांगल्या मतांनी विजयी झाले. शाळा व्यवस्थापन समिती महेलखेडी साठी प्रथमच मतदानाद्वारे पार पडले अशी परिसरात चर्चा आहे. मतदान प्रक्रिया केंद्रप्रमुख विजय ठाकूर , प्रमोद सोनार , मोहम्मद तडवी , शिवाजी लोले मुख्याध्यापक महेलखेडी निरीक्षक म्हणून यांनी कामकाज पाहिले. आमच्या पॅनल चे सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन व स्वागत मा.आ. चंद्रकांत सोनवणे, सौ लताताई सोनवणे आमदार चोपडा विधानसभा,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व मार्केट कमिटीचे सभापती मुन्ना भाऊ पाटील, रवी भाऊ सोनवणे तालुकाप्रमुख, भरत चौधरी सर स्वराज फाउंडेशन चे अध्यक्ष या सर्वांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी शिवसेना विभाग प्रमुख आशिष झुरकाळे, राजू पाटील रितेश महाजन, ललित पाटील, शैलेंद्र महाजन,फत्तू पटेल, रज्जाक तडवी, युनुस देशमुख,ललित कपले, नामदेव झुरकाले,अर्जून महाजन, प्रमोद महाजन, परिक्षित महाजन, कुंदन पाटील, जितेंद्र पाटील, आनंदा येवले, खालील पटेल या सर्वांनी पॅनल विजयी करण्यासाठी मेहनत घेतली….

 

Spread the love