महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षासाठी ममुराबाद येथील विद्यालयात १९२ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा …

0
53

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

ममुराबाद -गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली महाराष्ट्र पोलीस भरती 2021 ची तारीख जाहीर झाली. नोव्हेंबर 2019 मध्ये 5200 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यात पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलीस पद व पोलीस वाहन चालक यांचा समावेश होता.

सध्याच्या शासन नियमाप्रमाणे आधी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे,मग शारीरिक चाचणी घेण्यात येईल खूप सारे विद्यार्थी लेखी परीक्षा सप्टेंबर मध्ये होईल असा विचार करत होते.

नुकतेच शिक्षण अधिकारी (माध्यमिक शिक्षण विभाग) जिल्हा परिषद, जळगाव यांच्याकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी शाळा इमारत व कर्मचारी उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली आहे.

https://youtu.be/UYdCJ5Tezik

या परिपत्रकात त्यांनी महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी ग्रामीण व शहरी भागावर शाळा केंद्रांवर महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा घेतली जाणार आहे. या परिपत्रकात लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने महाआयटी यांच्या शासन निर्णयानुसार घेण्यात येईल. म्हणून या परीक्षेसाठी संबंधित शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयाने आवश्यकते प्रमाणे कर्मचारीवर्ग (मनुष्यबळ) उपलब्ध करून द्यावा असे सुद्धा या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने आज ममुराबाद येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय येथे वेगवेगळ्या ठिकाणाहून जवळपास 192 विद्यार्थी परीक्षेला आले होते. त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विष्णू चौधरी .शिक्षक अशोक सपकाळे, अनिता सावळे, संगीता पाटील, प्रशांत देसले,शरद पाटील, उल्हास पाटील, किशोर मशाने, सतीश पाटील, पितांबर मोतीराया, अश्विनी पाटील,लखीचंद पाटील, शिपाई मुकुंदा सोनवणे, यांनी परीक्षेवेळी सहकार्य केले. तसेच परीक्षेसाठी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना मार्गदर्शक सूचना करून चोख बंदोबस्त ठेवला होता .

Spread the love