महाराष्ट्र पोलिसांचा ‘योगी पॅटर्न’, बदलापूरच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षयचा गेम ओव्हर? धावत्या जीपमध्ये अक्षय शिंदेचा गेम, 

0
44

बदलापूरच्या शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या आहेत.

मुंबई : बदलापूरच्या शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या आहेत. अक्षय शिंदे याने तपासादरम्यान स्वत:वर गोळीबार केला आहे, यात त्याला तीन गोळ्या लागल्या आहेत. तर एक पोलीसही गोळीबारात जखमी झाला आहे. अक्षय शिंदे या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. गोळीबारानंतर अक्षय शिंदे आणि जखमी झालेल्या पोलिसाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

अक्षय शिंदे याने पोलिसांकडे असलेली बंदूक हिसकावून घेतली आणि स्वत:वर गोळी मारली. यानंतर दुसऱ्या पोलिसाने अक्षय शिंदेवर गोळी झाडली असल्याचं सांगण्यात येत आहे. या गोळीबारामध्ये एका पोलिसाच्या पायाला गोळी लागली आहे.

बदलापूर प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे पोलीस जेलमधून घेऊन जात होती तेव्हा अक्षयने जीपमध्ये पोलिसांकडे असलेली रिव्हॉल्वर हिसकावीली आणि स्वत:वर गोळी झाडल्याचं सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र पोलिसांचा योगी पॅटर्न?

दरम्यान महिला अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेशमध्ये आरोपींवर गोळीबार झाल्याचे बरेच प्रकार याआधी घडले आहेत. पोलीस कस्टडीमध्ये असताना या आरोपींनी स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या. उत्तर प्रदेशमधल्या या घटनांचा उल्लेख योगी पॅटर्न म्हणूनही केला जातो.

बदलापूर प्रकरणानंतर संतापाची लाट

बदलापूरच्या शाळेमध्ये सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदेने दोन मुलींवर अत्याचार केले. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी बदलापूरमध्ये मोठं आंदोलन झालं. संतप्त नागरिकांनी दिवसभर रेल रोको आंदोलन केलं होतं, त्यामुळे संपूर्ण दिवस बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी आणि कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.

Spread the love