प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्य अधिवेशन दिवाळी सुट्टी कालावधीमध्ये जळगाव येथे प्रस्तावित असून सदर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याच्या विविध विभागाच्या ॲडहाॅक जिल्हा कार्यकारिणी रविवार दि . २७ रोजी संघटनेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत जाहीर करण्यात आल्या. याप्रसंगी निवड समितीचे प्रमुख धनराज मोतीराय प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. जळगाव येथे माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे संघटनेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सन २०२५ ते २०३० या कालावधी करिता कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून
जळगाव पूर्व विभागातून प्रशासकीय विभागाचे जिल्हाध्यक्षपदी योगेश गांधेले (भुसावळ) यांची निवड करण्यात आली. यातील उपक्रम विभागाचे जिल्हाध्यक्षपदी एम. आर. चौधरी (वरणगाव), महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी मनीषा देशमुख (भुसावळ) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रवींद्र सोनवणे (किनगाव) यांची कार्याध्यक्षपदी, सादिक तडवी (जामनेर) व श्रीमती शुभांगी चौधरी (शेंदुर्णी) यांची जिल्हा उपाध्यक्षपदी व युवराज कुरकुरे (वरणगाव) यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली.
या प्रसंगी नाशिक येथील राज्य कार्यकारिणीच्या सभेत निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात उत्तर महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्षपदी प्रमोद आठवले (भुसावळ), खानदेश विभाग अध्यक्षपदी सरिता वासवानी (भुसावळ), यांची निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.