झाडाला गळफास घेऊन दहिवद येथील मजुराची आत्महत्या

0
25

अमळनेर – दहिवद येथील गावाबाहेर असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील एका मजूराने दुपारी २ वाजेच्या सुमारास शाळेसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

चोपडा तालुक्यातील बोरअजंटी येथील रहिवासी भय्यासाहेब यशवंत कोळी (वय ३१) हे दहिवद येथील आश्रमशाळेत सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाचे पहारेकरी म्हणून काम करण्यासाठी गत ५ ते ६ महिन्यांपासून पत्नी व मुलांसोबत वास्तव्याला होता. दरम्यान, शनिवारी दुपारच्या सुमारास त्याने अचानक लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शाळेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ त्यांना खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी संध्याकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, भय्यासाहेब कोळी यांनी आत्महत्या का केली असावी, याचे कारण मात्र समजले नाही. या घटनेचा तपास पो. हे. कॉ. सुनील जाधव करत आहेत. दरम्यान तरुण मजुराचा मृत्यू झाल्याने दहिवद तसेच बोरअजंटी परिसरात शोककळा पसरली आहे.

Spread the love