ममुराबाद-: येथील चंद्रकांत निळकंठ पाटील वय ३५ हे चंद्रकांत राजराम खडके रा.जळगाव याची आव्हाणे शिवारात असलेली शेती गट नंबर ३१९ ही सुमारे चार वर्षा पासुन नफ्याने करीत असुन त्यात चंद्रकांत पाटील यांनी चालु वर्षी मक्याची पिक लावले होत.
दि.२९/१०/२००२२ रोजी सायकाळी ५ वा.चे. सुमारास सदर शेतामध्ये लावले मक्याचे पिक पुर्ण झाल्याने मका कापुन त्याचे कणिसाचा ढिग शेताच्या एका बाजुला लावुन तेथेच जवळ मक्याचा कडबा शेतात गुळ लावुन ठेवला होता. व शेताचे कामे आटोपल्याने सर्व घरी निघुन आलो. त्यानंतर आज दि.३०/१०/२०२२ रोजी सकाळी ८ वाजेचे सुमारास नेहमी प्रमाणे शेताची कामे असल्याने शेतात गेलो असता. कापुन ठेवलेल्या मक्याचा कनसाच्या ढिग जळालेला दिसला सदर कणसाच्या ढिगाजवळ त्यांनी जावुन पाहीले असता मक्याच्या कणसाच्या ढिगातील बरेचसे कणसे हे जळालेले होते व त्या ठिकाणची आग विझलेली होती सदरची आग हि कदाचीत वातावरनातील सकाळी पडलेल्या दवा मुळे विझुन गेलेली असावी.सदर आगी मुळे काढुन ठेवलेले बरेच कणीस जळुन नुकसान झाले आहे. शेतात मक्याच्या कणसाच्या ढिगाला लागलेली सदर ची आग नक्की कशामुळे लागली आहे. याबाबत मला काहीएक सांगता येणार नाही.अशी माहिती शेतकरी चंद्रकांत पाटील यांनी दिली.सदर आगी बाबत माझा कोणावरही संशय नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी पोलिसात तक्रार देताना सांगितले.