ममता बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी; प्रोफेसर विरोधात गुन्हा दाखल

0
13

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सोशल मीडियाद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोलकाता विद्यापीठाच्या एका प्रोफेसरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठाचे पीएचडी करणारी विद्यार्थिनी तमाल दत्ता हिच्या तक्रारीवरून स्ट्रीट पोलीस स्थानकामध्ये प्राणीशास्त्र शिकवणारे प्रोफेसर अरिंदम भट्टाचार्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुर्तास त्यांना अटक करण्यात आली नसल्याचेही ते म्हणाले. भट्टाचार्य यांच्याविरोधात आयपीसी कलम 505 (1बी), 506 आणि 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love