ममुराबाद गावाजवळ ड्रॉयव्हरचा ताबा सुटल्याने क्रुझर गाडीचा भिषण अपघात; एक ठार, तिन जखमी

0
39

प्रतिनीधी अमर पाटील

ममुराबाद -: आज दिनांक 17 रोजी सकाळी सहा ते साडे सहा वाजेच्या सुमारास ममुराबाद गावापासून विदगाव रस्त्यावर हाकेच्या अंतरावर शिरपुर वरुन येत असलेल्या क्रुझर गाडीचा भिषण अपघात झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक सतरा रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास वाडी तालुका शिरपुर येथुन मजुर घेऊन जळगावला जात असलेली क्रुझर गाडी क्रमांक एम एच 18 बी आर 0806 ही ममुराबाद लक्ष्मीनगर जवळ ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या विरुध्द दिशेला मोठ्या गटारीमध्ये उतरल्याने भिषण अपघात झाला या अपघातात कांतिलाल हिरालाल पावरा याचा जागीच मृत्यु झाला तर गोकुळ भील, बांग्र्या, व रंजीत, हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात लावण्यात आले आहे. घटनास्थळी तालुका पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार माणिक सपकाळे, साहेबराव पाटील, विलास शिंदे, होमगार्ड लिलाधर पाटील, हे हजर होऊन रस्ता मोकळा केला त्यानंतर मयत कांतीलाल पावरा याला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.पुढील तपास माणिक सपकाळे हे करीत आहेत.

Spread the love