ममुराबाद ग्रामपंचायतचे पालकमंत्र्यांना साकडे ममुराबाद येथील शेती नुकसानीचे पंचनामे सरसकट करण्याची मागणी

0
85

जळगाव -तालुक्यातील ममुराबाद व संपूर्ण परिसरात ऑगस्ट 2020 च्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत अतिवृष्टी तथा ढगफुटी सारखा पाऊस झाला असून ममुराबाद व परिसरातील संपूर्ण उडीद. मूग. सोयाबीन. कापूस. या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. तरी ममुराबाद व संपूर्ण परिसरातील शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मिळावे. व नुकसानीची रक्कम हेक्टरी 50 हजार रुपये इतकी शेतकरी बंधूंना मिळावी. अशा मागणीचे निवेदन जळगाव पंचायत समिती सदस्य जनार्दन कोळी . तसेच ममुराबाद येथील ग्रामपंचायत सरपंच हेमंत चौधरी. उपसरपंच नासिर शेख. ग्रामपंचायत सदस्य अनिस पटेल. महेश चौधरी. सचिन पाटील. विलास शिंदे. शैलेश पाटील. गोपाल मोरे. राजेंद्र शिंदे. अमर पाटील. संतोष कोळी ग्रामस्थ भरत शिंदे. नबी पटेल.

Spread the love