प्रतिनीधी – अमर पाटील
जळगाव- जळगाव पासुन दोन किलोमीटरच्या अंतरावर ममुराबाद रस्त्यावर असलेल्या विहीरीत उडी घेऊन एका 32 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे आज दिनांक 25 रोजी उघड झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि जळगाव शिवारातील जळगाव ते ममुराबाद रोडवरील पश्चिम बाजूस असलेल्या नारायण झिपरु फेगडे यांचे विहीरीत एका तरुणाने उडी घेवून आत्महत्या केल्या बाबतची माहिती दिनेश सुरेश पाटील रा. कांचननगर कालंका माता मंदीराजवळ यांनी दिली.मयत तरुणाचे नाव दिपक खुशाल पाटील वय-32 रा. चौघुले प्लाट जळगाव.
दिपक खुशाल पाटील हा त्याच्या कुंटुबियासह चौघुले प्लाट जळगाव येथे राहत होता. दिपक पाटील हा काल दि. 24/06/2022 रोजी रात्री 9.00 वाजेच्या सुमारास राहते घरून त्याचे मोटार सायकलने निघाला होता. तो आज सकाळ पर्यंत घरी परत न आल्याने त्याचे नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता दुपारी 3 वाजेच्या सुमारास जळगाव शिवारातील जळगाव ते ममुराबाद रोडवरील पश्चिम बाजुस असलेल्या नारायण झिपर पेगडे यांच्या विहीरीजवळ त्याचा मोबाईल दिसुन आला. व त्याची मोटार सायकल रोडावर लागलेली दिसली त्यावरून आजुबाजुला त्याचा शोध घेतला असता दिपक याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.त्याचे प्रेत विहीरीतून काढल्यावर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. मृत्युचे कारण अद्याप समजलेले नाही.पुढील तपास पो.उपनिरीक्षक गणेश सायकर, स फ़ौ माणिक सपकाळे, साहेबराव पाटील हे करीत आहे.












