खळबळजनक : ममुराबाद रस्त्यावर तरुणाचा संशयास्पद मृत्यू !!

0
11

शहरातील ममुराबाद रस्त्यावर उस्मानिया पार्क भागातील तरुणाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. शेख गफ्फार शेख जब्बार (वय ३५, रा. उस्मानियॉ पार्क शिवाजीनगर) असे मयत तरूणाचे नाव आहे.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तरूणाच्या नातेवाईकांनी मोठी प्रमाणावर गर्दी केली होती. शेख गफ्फार हे बांधकामाचे सेंटींग काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. आईवडील, पत्नी, भाऊ व दोन मुलांसह शहरातील उस्मानिया पार्क शिवाजी नगर येथे रहातात.

बुधवारी दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी नेहमी प्रमाणे शेख गफ्फार हा आपले काम आटोपून घरी निघाला होता. परंतू तो रात्री घरी उशीरापर्यंत न आल्यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध घ्याला सुरुवात केली परंतु गफ्फार शेख हा कोठेही आढळून आला नाही. आज गुरूवारी २७ जानेवारी रोजी दुपारी १ वा. सु ममुराबाद रोडवरील कोंबडी फार्मजवळ त्यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे.शेख गफ्फार यांच्या डोक्यावर, हनुवटीवर मार लागल्याचे प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. जळगाव तालुका पोलीस आणि नातेवाईकांनी धाव घेतली व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आलेला आहे. गफ्फार शेख या तरूणाचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशयित नातेवाईकांकडून केले जात आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक कल्यान कासार पोलीस कर्मचारी साहेबराव पाटील , माणीक सपकाळे पुढील तपास करीत आहे.

Spread the love