ममुराबाद ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : सार्वजनिक माहिला शौचालयांची झाली दुरवस्था

0
51

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क
जळगाव– तालुक्यातील ममुराबाद ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे गावात वार्ड क्रमांक 3,,,4,,,5,,, मध्ये बांधलेल्या महीला शौचालय परिसर व गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, या घाणीच्या गोंधळामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकाराने महीला वर्गात ग्रामपंचायत विरोधात तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मागील काही वर्षापासुन गावाचा विकास हरवल्याचे चित्र दिसत आहे. १३ व्या व१४ व्या वित्त आयोगच्या निधी पूर्णपणे पाण्यात गेला असल्याचा आरोप गावकरी करत आहेत. निधी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतांना गावाचा विकास स्वार्थापोटी आजी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी केला नसल्याचेही ग्रामस्थ बोलत आहेत. १५ व्या वित्त आयोगाचा लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायतीस प्राप्त झाला आहे. मात्र, ग्रामपंचायत गावातील महिलांच्या शौचालयांची जिर्ण अवस्था व पुरुष शौचालयाकडे दुर्लक्ष करत आहेत. यातूनच महीलांना उघडयावर शौचास बसावे लागत आहे. गावात वरिल वार्डमध्ये महिला शौचालये आहेत परंतु साफसफाई होत नसल्यामुळे महिलांना रस्त्यावरच शौचास बसावे लागत आहे.गावात विविध ठिकाणी मुताऱ्या देखील नाहीत. आणी एखाद्या दोन ठिकाणी आहेतही परंतु त्या मुतार्यांची साफसफाई होत नाही.या गंभीर नागरी समस्याबाबत ग्रामपंचायतीकडे नियोजन नसल्याचे दिसून येत आहे.आजपर्यंत ममुराबाद ग्रामपंचायतीवर सरपंच व सदस्य यांनी गावाचा विकास न करता स्वतःचा विकास करून घेतल्याची संतप्त भावना गावंकऱ्यांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. ममुराबाद गावाच्या सर्व नागरी समस्याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी गावाकडे लक्ष देवुन १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतुन किमान ग्रामस्थांच्या विविध समस्या सोडवाव्यात व ममुराबाद गावाच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Spread the love