जळगाव– :तालुक्यातील ममुराबाद येथे वेगवेगळ्या भागात, नऊ दिवशीय घटस्थापना उत्साहात पार पडली आहे.
गेल्या दोन वर्षाच्या कोरोना संसर्गानंतर यंदा या वर्षात नवरात्रीचे उत्सव होत असल्याने सार्वजनिक मंडळामध्ये उत्साह संचारलेला आहे . यावल , रावेर, जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूर या ठिकाणावरून देवीच्या आकर्षक मुर्त्या आणण्यात आले आहे. या वर्षी गावात जवळपास 16 सार्वजनिक मंडळांनकडुन देवीची स्थापना करण्यात आली आहे.
गावात अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मंडळाचे कार्यकर्त यांच्याकडुन दुर्गोत्सवाच्या स्थापनेचे काम सुरू होते. स्थापनेनिमित्ताने गावात सर्व मंडळांनी विधवित पुजा करुण उशीरा पर्यन्त स्थापना केली.यावेळी देवीच्या आकर्षक मुर्त्यानी गावकर्यांचे लक्ष वेधले .
गेल्या दोन वर्षाच्या कोरोना संसर्ग नंतर यावर्षी नवरात्री उत्सवात तरूण व युवा वर्गाचा उत्साह दांडगा आहे. सप्ताभरापासून नवरात्री उत्सवाची स्थापनेसाठी मंडप आरास रोषणाई यामध्ये युवा वर्ग दंग होता.सोमवारी नवदुर्गेची स्थापना उत्साहात करण्यात आली आहे.
उत्सव उत्साहात व शांततेत साजरा करण्यासाठी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने शांतता समिती सदस्य व मंडळ पदाधिकाऱ्यांना दुर्गोत्सव शांततेत पाडण्यासाठी सुचना दिल्या यावेळी पोलीस पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस कर्मचारी माणिक सपकाळे, विश्वनाथ गायकवाड, वासुदेव मराठे, बापु कोळी, गोपनिय विभागाचे लोखंडे, इत्यादी उपस्थीत होते,










