जळगाव – तालुक्यातील ममुराबाद येथील ग्रामपंचायतीमध्ये ७५ वा स्वांतत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला . सरपंच श्री हेमंत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .त्यानंतर जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत ग्रामपंचायत सदस्या सौ अंजना शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . यावेळी सरपंच हेमंत चौधरी,उपसरपंच शेख अस्माबी सदस्य अनिस पटेल गोपाल मोरे शैलेंद्र पाटील एजाज पटेल सुनिता चौधरी साधना चौधरी आधी ग्रामपंचायत सदस्य प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे श्री लोखंडे, तलाठी श्री पालवे, अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर बचत गटाच्या कार्यकर्त्या,मुख्याध्यापक श्री अविनाश मोरे व संपूर्ण शिक्षक स्टॉप व ग्रामस्थ उपस्थित होते .ग्रामपंचायत सदस्य अंजना शिंदे यांनी पूजा करून ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर शिक्षिका श्रीमती कल्पना चौधरी यांनी माझा मोबाईल अभ्यासमित्र याबाबत माहिती दिली . व विद्यार्थिनी विशाखा बुधा सोनवणे हिने स्वतंत्र दिन याबाबत इंग्रजी मध्ये भाषण दिले .त्यानंतर आंबेडकर नगर मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दत्त मंदिर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अशा प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले .