ममुराबाद येथे ईद निमीत्त सामुहिक नमाज पठन…

0
49

ममुराबाद -: ममुराबाद येथे आज दि.03 मे रोजी मुस्लीम बांधवांनी रमजान ईद हा पवित्र सण उत्साहाच्या व शांततेच्या वातावरणात साजरा केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ममुराबाद येथे मशिदीमध्ये मौलाना हतरत जी रियाजोद्दीन बरकती यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ९:१५ वाजता सामुहिक नमाज पठन करण्यात आले. यावेळी शेकडो मुस्लीम बांधवांनी नमाज पठन केले. नमाज पठन करूण देशभरात ईदचा उत्साह, ममुराबाद येथे सामुहिक नमाज पठन करून एकमेकांची गळाभेट घेण्यात आली. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांची एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर लहान मुलांना ईदी भेट देण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 2 वर्ष निर्बंध असल्याने सर्व सण उत्सव शासनाच्या नियमावलीमध्ये साजरे करावे लागले. पण, यंदा शासनाने नियमावलीत शिथीलता आणल्याने यंदाची ईद ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्याबाबतची तयारी देखील मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. गेला महिनाभर मुस्लिम बांधव रमजान महिन्याचे कडक उपवास करीत होते. पहाटे सहेरी करून सूर्यास्तानंतर इफ्तारी करत दिवसभराचा निर्जल उपवास सोडला जात होता. त्याशिवाय विशेष नमाज पठण केली जात होती. कुराणाचे देखील पठण करीत अल्लाहाचे नामस्मरण करून सुख, शांती बरोबर आयुष्यात येणारी संकटे दूर करण्याची दुआ मागण्यात आली. मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याचा चंद्र काल दिसला. तर आज देशभरात रमजान ईद म्हणजे ईद उल फितर साजरी होत आहे.

याप्रसंगी मौलाना यांनी भाई चारा राष्ट्रीय एकतेचे संदेश आपल्या प्रवचनातून देण्यात दिले.

यावेळी मुस्लीम बांधवांच्या ईदच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रसंगी सर्व मुस्लीम बांधवांना ईदचा सन शांततेत साजरा करण्यासाठीचे आवाहन तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार यांनी केले. यावेळी मौलाना हजरत जी रियाजोद्दीन बरकती, शेख नासीर रसीद, ग्रा पं सदस्य अनिस भिकन पटेल, सादिक बाबुलाल पटेल, अरमान रहेमान पटेल, माजी ग्रा पं सदस्य सईद नासीर मुल्लाजी, कदिर शेख गनी, मंजुर सत्तार पटेल, हानिफ शेख मुनाफ, रफिक शेख गफुर, जब्बार शेख गुलाब,यांनी मशिजीमध्ये उपास्थिती राहुन मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यात दिल्या.

Spread the love