ममुराबाद येथील सेंट्रल बँकेचा कारभार ढेपाळला ! दिड महीन्यापासून व्यवहार ठप्प ; कायम स्वरूपी शाखा व्यवस्थापकाची गावकऱ्यांची मागणी !!

0
35

जळगाव –तालुक्यातील ममुराबाद व परिसरातील हजारो शेतकरी आणि व्यवसायीक, शाळेतील विध्यार्थी या सर्वाचे खाते सेंट्रल बॅकेत असुन बॅकेत कायम स्वरूपी शाखा व्यवस्थापक नसल्याने नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे कि मागील दिड ते दोन महीन्यापासून सर्वर डाऊन च्या नावाखाली बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झालेले आहे. याबाबत अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करून देखील कोणताच परिणाम न होता उलटपक्षी बँकेत जाणारे शेतकरी, जेष्ठ नागरीक, ०यवसायीक आणि निराधार व्यक्तींना बँकेचे कर्मचारी सर्वर डाऊन असल्याचे कारण देत आहेत. बँकेच्या या कारणामुळे सर्व सामान्यांची गैरसोय होत आहे.

बँकेत बरेच महिन्यापासून शाखा व्यवस्थापक नसल्यामुळे तेथील नागरिकांना आपले बँक खाते दुसऱ्या बँकेत वर्ग करण्याची वेळ आलेली आहे .सेंट्रल बँक बँक शाखा ममुराबाद येथे आजूबाजूच्या परिसरातील गावे जोडल्यामुळे खातेदारांची संख्या वाढलेली आहे तसेच निराधार लोकांचे खाते सुद्धा याच बँकेत असल्यामुळे त्यांचा पगार देखील बँकेतच जमा होतो व तो पगार काढण्यासाठी खेड्या गावावरून आलेल्या खातेदारांच्या रांगाच्या रांगा पाहायला मिळतात .सेंट्रल बँक शाखा ममुराबाद येथे पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे येथील खातेदारांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे .

बँकेतील प्रिंटर सतत नादुरुस्त

गावातील लाईट वारंवार ये-जा करत असल्यामुळे व बँक शाखेतील इन्व्हर्टर खराब असल्यामुळे प्रिंटर बंद झाले आहे .खातेदारांनी आपल्या पासबुकावर एन्ट्री करायचे सांगितल्यास प्रिंटर बंद असल्याचे कारण सांगून टाळाटाळ केली जात आहे .

याबाबत बँकेतील कॅशियर कर्मचारी कल्पना म्हैसकर यांना याबाबत माहिती विचारली असता वरिष्ठांकडे बऱ्याच वेळेस वाढीव स्टॉपची मागणी करून देखील अद्याप पावेतो मागणीकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे खातेदारांना त्रास सहन करावा लागत आहे .

दिवसं दिवसभर सेन्ट्रल बॅकेतील सर्वर डाऊन असल्याने खेडयावरील त्रस्त शेतकऱ्यांना बॅकेत झोपा काढायची वेळ आली आहे .

तरी बँकेत कर्मचाऱ्यांचा स्टॉप वाढवावा व बँकेत कायमस्वरूपी शाखा व्यवस्थापकाची नेमणूक करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे .

 

https://youtu.be/ZqhJrzdBgpg

Spread the love