जळगाव– तालुक्यातील ममुराबाद येथे सण 2014 -15 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजने मधून बांधण्यात आलेल्या साडे तीन लक्ष लिटरच्या मोठ्या पाण्याच्या टाकी मधून आज पर्यंत गावाला पाणीपुरवठा केला जात नसल्यामुळे. नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे .गावाला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा त्यासाठी जास्त क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली होत. शेजारीच असलेल्या जुन्या पाण्याच्या टाकी बाबत उप अभियंता पाणीपुरवठा विभाग जळगाव यांचेकडून वेळोवेळी जुनी पाण्याची टाकी जीर्ण झालेले असल्यामुळे ती टाकी पाण्याच्या वजनाने केव्हाही जमीन दोस्त होऊ शकते व त्यात जीवित आणि सुद्धा होऊ शकते तरी ती पाण्याची टाकी पाळून नवीन पाण्याची टाकी सुरु करण्याबाबत ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे . कमी क्षमतेच्या पाण्याच्या टाकी मुळे गावाला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने लवकरात लवकर राष्ट्रीय पेयजल योजनेतून बांधण्यात आलेली मोठी पाण्याची टाकी सुरू करून त्यामधून गावाला पाणीपुरवठा करण्यात यावा .मोठी पाण्याची टाकी सुरू करण्याबाबत बऱ्याच वेळेस ग्रामपंचायत प्रशासनाला सांगितल्यावर देखील आजपर्यंत टाकी सुरू करण्याबाबत कोणतेच पाऊल उचलले गेले नाही . तरी आपण येणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या एक तारखेपर्यंत टाकी सुरू न केल्यास जिल्हा परिषदे समोर उपोषण करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन महेंद्र सोनवणे यांनी ग्रामपंचायतीला दिले होते .
परंतु पाण्याच्या टाकी सुरु करण्या बाबत बाबत ग्रामपंचायतीने कोणतेच पाऊल उचलले नसल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजावर नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे .












