जळगाव -तालुक्यातील मुमराबाद येथे चर्चेत असलेल्या वार्ड क्रमांक तीन मधील नियम बाया झालेल्या सार्वजनिक महिला शौचालया बाबत दि 13/09 2021 रोजी महाशय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार देऊन सुद्धा आज पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने ग्रामपंचायत सदस्य सौ प्रीतम पाटील यांनी आज दिनांक 14 /12 /2021 रोजी परत एकदा कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायत मधील 14 व्या वित्त आयोगा आंतर्गत कृती आराखड्या प्रमाणे सार्वजनिक महिला शौचालय वॉर्ड क्रमांक 1 व 5 मध्ये मंजूर होते. परंतु सरपंच तथा ग्राम विकास अधिकारी यांनी मनमानी कारभार करून वार्ड क्रमांक 3 मध्ये महिला शौचालय बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे.सरपंच तथा ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने नियमबाह्य स्वरूपाच्या केलेल्या कामाबाबत मि आपणाकडे दिनांक 13/09 2021 रोजी लेखी स्वरूपात सदर विषयाबाबत सरपंच तथा ग्राम विकास अधिकारी यांच्या नियमबाह्य स्वरूपाच्या कामामुळे वार्ड क्रमांक 1 व 5 मधील महिलांना सार्वजनिक स्वच्छतेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाच्या 14 व्या वित्त आयोगातून पाच लाख रुपयाचे महिला शौचालय नियमबाह्य स्वरूपाने वार्ड क्रमांक 3 मध्ये बांधकामाची कुठलीही आवश्यकता नसताना सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने केवळ आर्थिक हितासाठी वार्ड क्रमांक 3 मध्ये महिला शौचालय बांधकाम केले आहे.
वार्ड क्रमांक 3 मध्ये या अगोदर 14 वा वित्त आयोग अंतर्गत साधारण 2 वर्षापूर्वी महिला शौचालय बांधण्यात आलेले होते.त्यामुळे वार्ड क्रमांक 3 मध्ये सार्वजनिक महिला शौचालयाची कुठलीही गरज नसताना निव्वड आर्थिक हितासाठी सदर महिला शौचालय वार्ड क्रमांक 3 मध्ये बांधकाम सरपंच /ग्राम विकास अधिकारी यांनी मनमानी कारभार केलेला आहे.
वार्ड क्रमांक 1 व 5 मध्ये महिला शौचालय नसल्यामुळे तेथील नागरिकांनी आणि महिलांनी ग्रामसभे मध्ये शौचालय साठी तोंडी तसेच लेखी स्वरूपात मागणी केलेले होती. परंतु सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी 14 वा वित्त आयोगातील शासनाच्या कृती आराखड्याला आणि ग्रामसभेला कुठल्याही प्रकारे महत्व न देता सर्व कायदे आणि नियम धाब्यावर बसवून हुकूमशाही पद्धतीने नियमबाह्य कार्य केलेले आहे.
वार्ड क्रमांक 1 व.5 मधिल महिलांन पासुन त्यांच्या सार्वजनिक स्वच्छतेचा हक्क हिरावून घेतलेला आहे. आणि सदर नियमबाह्य झालेल्या खर्चाला मंजुरी देणाऱ्या ग्रामपंचायत मधील सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील नियमबाह्य खर्चाला मंजुरी देऊन चुकीच्या कामांमध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नियमबाह्य खर्चाला मंजुरी देऊन सर्व सदस्यांनी शासनाच्या खर्च झालेल्या पाच लाख रुपयाच्या नुकसानीस जबाबदार असल्याचे सिद्ध करून दिलेले.आहे त्यामुळे ममुराबाद ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा सर्व सदस्यांनवर नियमबाह्य खर्च केलेल्या रक्कमेची वसुली करून त्यांचेवर अपात्रतेची कारवाई करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच ग्राम विकास अधिकारी यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी
सदर विषयाची आपल्या कार्यालयाकडे दिनांक 13 /09 /2021 रोजी लिखित स्वरूपात तक्रार सादर केलेली असून आपल्या कार्यालयाकडून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याचे दिसून येत आहे. तरी आपणास विनंतीपूर्वक स्मरण पत्र सादर करून आपणास पुन्हा कळवू इच्छिते की सदर प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करून लवकरात लवकर संबंधित लोकांवर कारवाई होऊन मिळावी अशी नम्र विनंती.












